पनवेल : रायगड जिल्ह्यात 15 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची बुधवारी (दि. 22) नोंद झाली असून, 439 नव्या रुग्णांची भर पडली. मृत रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील आठ, खालापूर, पेण, अलिबाग प्रत्येकी दोन आणि माणगाव तालुक्यातील एकाचा समावेश आहे, तर पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण पनवेल तालुक्यात 199, खालापूर 53, पेण 42, महाड 33, अलिबाग 25, रोहा 24, उरण 18, माणगाव व श्रीवर्धन प्रत्येकी 11, कर्जत नऊ, म्हसळा व पोलादपूर प्रत्येकी पाच आणि सुधागड तालुक्यात चार असे आहेत. दुसरीकडे दिवसभरात 401 रुग्ण बरे झाले. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 11,534वर पोहचला असून, मृतांची संख्या 308 इतकी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 7696 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने सध्या 3581 सक्रिय रुग्ण आहेत.
Check Also
दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार
रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …
RamPrahar – The Panvel Daily Paper