Breaking News

भाजप खारघर आणि तळोजा मंडल अध्यक्षपदी विनोद घरत

पनवेल : प्रतिनिधी

भारतीय जनता पक्ष, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता युवा मोर्चा, खारघर आणि तळोजा मंडल कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून विनोद घरत यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे

या कार्यकारणीमध्ये सरचिटणीस अमर रमेश उपाध्याय, उपाध्यक्ष शुभ पाटील, अक्षय श्यामराम पाटील, सचिव फुलाजी ठाकूर, पप्पू खामकर, कोषाध्यक्ष प्रमोद पाटील,  सदस्य प्रदीप पाटील, कमलकांत लंका, सचिन फडके, मनीष जैन, सिद्धेश सावंत, सुशांत पाटोळे, राजु आचलकर, सुजीत पांडे यांचा समावेश आहे. खारघर आणि तळोजा मंडल मधील युवकांचे प्रश्न सोडवण्याकडे लक्ष देणार असून खारघरमध्ये मोठ्या प्रमाणात असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे संघटन बांधून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे अध्यक्ष विनोद घरत यांनी सांगितले.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply