Breaking News

‘सही रे सही‘ला सहकार्याचा हात

‘अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी’ असलेल्या टीमची मदतीसाठी धाव

खोपोली : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला जात असताना मुंबई-पुणे महामार्गावर  ‘सही रे सही‘ या नाटकाच्या कलाकारांची बस बंद पडली. याची माहिती कर्जतचे नायब तहसीलदार पुरुषोत्तम थोरात यांना मिळताच, त्यांनी खोपोलीतील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या टीमला पाचारण केले.

टीमचे प्रमुख गुरुनाथ साठेलकर, सदस्य हनीफ करंजीकर यांनी पहाटे चार वाजल्यापासून सकाळी नऊ वाजेपर्यंत प्रयत्न करून बसमधील कलाकारांना पुढच्या प्रवासाला जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली. सदर क्षेत्र अपघात प्रवण असल्याने अत्यंत जोखीम पत्करून हे मदत कार्य करण्यात आले. याबाबत अभिनेते भरत जाधव यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले आहेत.

आयआरबी पेट्रोलिंग आणि महामार्ग पोलीस यांच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी जयंतीनिमित्त कार्यक्रम साजरा करण्यासाठी जात असलेल्या कलाकारांना मदत करून खर्‍या अर्थाने शिवजयंती साजरी केल्याचा आनंद मिळाला, अशी भावना गुरु साटेलकर यांनी व्यक्त केली.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply