Breaking News

फटाक्यांमुळे डोंगरावर लागलेली आग विझविण्यात पर्यावरण प्रेमींना यश

पनवेल : वार्ताहर

तळोजा कारागृह शेजारी असलेल्या डोंगरावर लागलेली आग विझविण्यात पर्यावरण प्रेमींना यश आले. काही तरुणांनी संध्याकाळी डोंगरालगत फटाके फोडल्यामुळे डोंगरावर आग लागली होती. दरम्यान, तरुणांनी वन संपदा नष्ट करण्याऐवजी वाचविण्यासाठी सहकार्य करावे तसेच डोंगरावर फटाके फोडू नयेत, असे आवाहन पर्यावरण प्रेमींनी केले आहे.

खारघर सेक्टर-35 मधील तळोजा कारागृह लगत असलेल्या डोंगरावर वणवा पेटला. या वेळी डोंगरावर गेलेल्या चार ते पाच तरुणांनी आग विझविण्यास सुरुवात केली. दरम्यान, एका नागरिकाने या आगीबाबत खारघर अग्नीशमन केंद्राला माहिती दिली. त्यानंतर काही वेळाने अग्नीशमन दल जवानांनी घटनास्थळी येवून डोंगराच्या पायथ्याशी लागलेली आग आटोक्यात आली.

दरम्यान, डोंगर माथ्यावर वणवा लागल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले, मात्र डोंगरावर अग्निशमन दलाचा बंब पोहचू शकत नसल्यामुळे आग्नशमन दल जवान माघारी फिरले. या वेळी पर्यावरण आणि पक्षी प्रेमी ज्योती नाडकर्णी तसेच त्यांचे दोन सहकारीडोंगरावर लावलेल्या रोपट्यांलगतची गवत काढत होते. त्या तिघांनी डोंगर माथ्यावर लागलेली आग रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास आटोक्यात आणली.

तळोजा कारागृह लगत असलेल्या डोंगरावर पर्यावरण प्रेमींनी लावलेली रोपटी आगीपासून सुरक्षित आहेत, मात्र पावसाळ्यात डोंगरावर उगवलेली नैसर्गिक रोपटी जळून खाक झाली. तिघांनी आग आटोक्यात आणली नसती तर ओवे डोंगरावर लागलेला वणवा आटोक्यात आले नसता. त्यामुळे हजारो झाडे जळून खाक झाली असती. पुन्हा डोंगर परिसरात वणवा पेटू नये म्हणून गवत कापणीचे काम सुरु करण्यात आले आहे, अशी माहिती ज्योती नाडकर्णी यांनी दिली.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply