Breaking News

सेवाभावी संस्थांचा ‘त्यांना’ आधार

पनवेल : प्रतिनिधी

मुंबई, नवी मुंबई आणि पनवेलच्या माया नगरीत असा एक वर्ग आहे. त्यांच्या पर्यंत ही मदत पोहचतच नाही आणि तो मागू ही शकत नाहीत. कारण तो आपली ओळख देऊ शकत नाही. तो वर्ग म्हणजे बार गर्ल्स आणि सेक्स वर्करचा त्यांच्यासाठी आज आधार आहे तो आश्रय सोशल फाऊंडेशन व लोकपरिषद या सेवाभावी संस्था.

पनवेलमध्ये अशोक गायकवाड आपल्या आश्रय सोशल फाऊंडेशन व लोकपरिषद या सेवाभावी संस्था मार्फत महिला व बालसबलीकरण कार्यक्रमा अंतर्गत बार गर्ल्स आणि देह विक्रय करणार्‍या अति जोखीम महिलांमध्ये एड्स विषयी जन जागृतीचे काम गेली 15 वर्षे करीत आहे. लॉकडाऊनमुळे बार बंद झाले. त्यामुळे या मुलींचे उत्पन्न बंद झाले. या मुलींच्या उत्पन्नावर गावाला घर चालत असते. त्यांची मुले शिक्षण घेत असतात शहरात या काय व्यवसाय करतात माहीत ही नसते. त्यामुळे लॉकडाऊन झाल्यावर या घरी ही जाऊ शकत नाहीत. या महिला सध्या ज्या गावात किंवा सोसायटीत राहतात त्या ठिकाणी ओळख लपवून रहात असल्याने त्यांना शासनाकडून आलेली किवा स्वयंसेवी संस्थांकडून आलेली मदत घेण्यासाठी रांगेत उभे राहता येत नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. आश्रय सोशल फाऊंडेशन व लोकपरिषद या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अशोक गायकवाड यांच्याकडे त्यांनी आपली अडचण सांगितल्यावर रायगड जिल्हा महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी महेंद्र गायकवाड, वंजारी व महेंद्र पाटील, महापालिकेच्या संरक्षण अधिकारी दिप्ती रामरामे, यांच्याकडून तसेच एचपीसीएल एम्प्लॉईज वेल्फेअर असोसिएशन, विविध कंपन्या आणि संस्थांकडून अन्नधान्य मिळवून त्याचे वाटप करण्यास सुरुवात केली. विविध कंपन्या आणि संस्था कडून अन्नधान्य मिळवून संचालिका विमल गायकवाड, व्यवस्थापक ऊर्मिला यादव, शिल्पा हालनकर, रुकिया बारगीर, दीक्षिता गावंड, मेघा लोखंडे, अश्विनी लोंढे, संजिवनी सावंत, प्रज्ञा कांबळे, कल्पना ठोकल, मनिषा पवार, जयश्री जाधव, मीनल मोहिते, कारण निकम व नीता शिंदे या कार्यकर्त्यांमार्फत त्याचे वाटप केले. बार गर्ल्स आणि सेक्स वर्करना लॉकडाऊनमध्ये आश्रय सोशल फाऊंडेशन व लोकपरिषद या सेवाभावी संस्थांनी आधार मिळवून दिला आहे.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply