पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांनी पनवेलच्या नगरसेविका दर्शना भोईर यांची खारघरच्या संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. सदैव जनतेमध्ये असणार्या दर्शना भोईर यांचा दांडगा जनसंपर्क आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत या पदाची जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.