Breaking News

खानावमध्ये 82 लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल तालुकाध्यक्ष अरूणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आणि पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात अनेक विकासाची कामे सुरू आहेत. त्या अंतर्गत खानाव ग्रामपंचायतीमध्ये आमदार निधीमधून रस्त्याचे काँक्रिटीकरण आणि जलजीवन मिशन अंतर्गत विहिर बांधण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा बुधवारी (दि. 11) झाला. सुमारे 82 लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले. पनवेल तालुक्यातील खानाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील लक्ष्मण कोंडू पाटील यांच्या घरापासून ते तवले यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आमदार निधीतून सात लाख 89 हजार रुपयांचे हे काम करण्यात येणार आहे, तसेच गावामध्ये जलमिशन अंतर्गत व नळपाणी पुरवाठा योजनेच्या माध्यमातून 74 लाख 10 हजार 544 रुपयांचा निधी वापरुन विहिर बांधण्यात येणार आहे. या विकासकामांचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते बुधवारी झाले. या सोहळ्याला भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, खानाव ग्रामपंचायतीच्या सरपंच जयश्री दिसले, उपसरपंच बाळाराम पाटील, पुंडलिक तवले, गणु मुंडे, बाबु भोईर, एकनाथ फराड, बलीराम भोईर, हरीचंद्र वारदे, सुनील फराड, गणेश तातरे, शिवजी कर्णुक, दीपक तवले, निलेश वारदे, अनिल फराड, विजय पाटील, प्रतिक जाधव, लक्ष्मण पाटील, विलास भोपी, बबन जाधव, महेश पाटील, वाकडीचे माजी सरपंच नामदेव जमदाडे, कांचन पालकर यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी सांगितले की, आमदार प्रशांत ठाकूर पनवेल तालुक्यात विकासकामांसाठी भरघोस निधी आणतात. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये पाठपुरावा करून विकासाची कामे करून घ्यावीत तसेच प्रत्येक घरामध्ये पाणी पोहचले पाहिजे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्दिष्ट्य पूर्ण करण्याच्या द़ृष्टीकोनातून आपण सर्वांनी काम करावे, असे आवाहन केले आणि खानाव ग्रामपंचायतींच्या माध्यमातून करण्यात येणार्‍या विविध विकासकामांचे कौतुक केले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply