Breaking News

रायगडात 391 नवे रुग्ण; आठ जणांचा मृत्यू

पनवेल : रायगड जिल्ह्यात शनिवारी (दि. 1) 391 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून, आठ जणांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (महापालिका 143, ग्रामीण 37) तालुक्यातील 180, खालापूर 38, महाड 37, रोहा 27, अलिबाग 24, पेण 22, उरण 18, पोलादपूर 11, कर्जत, मुरूड व माणगाव प्रत्येकी नऊ, सुधागड तीन आणि श्रीवर्धन व म्हसळा प्रत्येकी दोघांचा समावेश आहे, तर मृत रुग्ण पनवेल (मनपा व ग्रामीण प्रत्येकी दोन) तालुक्यात चार, कर्जत, अलिबाग, महाड व श्रीवर्धन तालुक्यात प्रत्येकी एक असे आहेत. दुसरीकडे दिवसभरात 363 रुग्ण बरे झाले. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 15,592 आणि मृतांची संख्या 430 झाली आहे. आतापर्यंत 11,957 जणांनी कोरोनावर मात केल्याने 3205 विद्यमान रुग्ण आहेत.  

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply