Breaking News

पनवेलमध्ये भाजपतर्फे विकासाचा झंझावात

नगरसेवकांच्या निधीतून विविध कामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महापालिकेतील सत्ताधारी भाजप नगरसेवकांकडून अनेक कामे सातत्याने करण्यात येत आहेत. त्या अंतर्गत विजय चिपळेकर, नरेश ठाकूर, संजना कदम आणि अनिता पाटील यांच्या नगरसेवक निधीतून करण्यात येणार्‍या विकासकामांचे भूमिपूजन सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते गुरुवारी (दि. 19) करण्यात आले. त्याचप्रमाणे नागरिकांना बसण्यासाठी बाकड्यांचे लोकार्पण करण्यात आले.

पनवेल महापालिकेचे नगरसेवक विजय चिपळेकर यांच्या निधीतून कामोठे सेक्टर 20 व सेक्टर 23 येथे वाचनालय, कामोठे वसाहतीमध्ये बाकडे बसविणे, नगरसेवक अ‍ॅड. नरेश ठाकूर यांच्या निधीतून वाचनालय, कोपरा गावातील स्मशानभूमीसाठी मुतारी व शौचालयाचे बांधकाम, तसेच विविध ठिकाणी नागरिकांना विश्रांतीसाठी बाकडे बसविण्यात आले आहेत, तर नगरसेविका अनिता पाटील यांच्या निधीतून खारघरमधील शनिमंदिर, नाना-नानी पार्क आणि गार्डन भूखंड क्रमांक 65 येथे हायमास्ट दिवे उभारणे आणि नगरसेविका संजना कदम यांच्या निधीमधून वास्तुविहार येथे वाचनालय उभारणे यासारखी कामे करण्यात येणार आहेत. या कामांचे भूमिपूजन आणि बाकड्यांचे लोकार्पण मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

या कार्यक्रमांना पनवेल महापालिकेचे उपमहापौर विक्रांत पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, आरपीआयचे कोकण अध्यक्ष जगदीश गायकवाड, नगरसेवक अभिमन्यू पाटील, विकास घरत, नीलेश बावीस्कर, रामजी बेरा, नगरसेविका आरती नवघरे, कुसुम म्हात्रे, पुष्पा कुत्तरवडे, खारघर शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल, तालुका चिटणीस वासुदेव पाटील, राजेश गायकर, शनिमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नरेश तोडकर, भाजप नेते समीर कदम, कीर्ती नवघरे, केतन नवघरे, मोना आडवाणी, गीता चौधरी, साधना पवार आदी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामीण भागातही विकासाची गंगा

पनवेल विधानसभा मतदारसंघात सिडको अध्यक्ष, भाजप जिल्हाध्यक्ष व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून विविध विकासकामे करण्यात येत असतात. तशाच प्रकारे तालुक्यातील चिपळे, शिवणसई आणि धामणी येथे रस्त्याचे, तर दुंदरे येथे पाण्याची टाकी बसविण्याचे काम स्थानिक आमदार विकास निधीतून करण्यात येणार आहे. या विकासकामांचे भूमिपूजन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 20) करण्यात आले. या कार्यक्रमांना चिपळे येथे भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, युवा नेते विश्वजीत पाटील, शेखर शेळके, संदीप तांडेल, माजी उपसरपंच धनंजय पाटील, रामदास पाटील, के. एन. पाटील, एकनाथ म्हात्रे, अंकुश पाटील, चाहू पाटील, विष्णू पाटील, हरिश पाटील, महेंद्र पाटील, दुंदरे व शिवणसई येथे सरपंच अनुराधा वाघमारे, उपसरपंच रमेश पाटील, शांताराम चौधरी, गणेश उसाटकर, नारायण चौधरी, संदीप पाटील, विष्णू वाघमारे, शत्रृघ्न उसाटकर, धनंजय पाटील, धामणी येथे विकास भगत, गणेश शीद, कन्या खांडवी, लक्ष्मण भस्मा, मंगळ्या पारधी, बाळूू चौधरी, बबन भस्मा यांच्यासह कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply