मोहोपाडा : प्रतिनिधी – चौक वावर्ले येथील कानसा-वारणा फाऊंडेशनतर्फे राज्यातील विविध जिल्ह्यात विविध जातीच्या 4000 वृक्षाची लागवड करण्यात आली तर 2000 शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करुन गरजूंना किराणा सामानाचे किटही वाटप करण्यात आले.
संस्थापक दीपक पाटील, अध्यक्ष कृष्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कानसा-वारणा फाऊंडेशनचे पदाधिकारी सहकारी यांच्या सहकार्याने योगेश यादव व कांचन जाधव यांच्या वाढदिवसानिमित्ताने राज्यात सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या वेली राज्यातील कोल्हापूर शाहूवाडी तालूक्यातील विरळे या गावी गोरगरीब जनतेला धान्य कीट वाटप केले. तर गेवराई, केज, बीड, आष्टी, धारूर, माजलगाव तालुक्यातील मालेवाडी, ब्रम्हागाव, जवळबन, दहिफळ, पाली, करचुंडी, लुखामसला, खर्डावाडी आदी गावांत पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले.
तसेच लोखंडी सावरगाव येथे ग्रामदैवत महादेव मंदिर परिसरात वृक्ष लागवड, माजलगाव येथील मालेवाडी गावात वृक्ष लागवड, नाशिक, नगर, रायगड, बिड येथे वृक्ष वाटप व लागवड तसेच लोखंडी सावरगाव ता. अंबाजोगाई येथे कानसा-वारणा फाउंडेशन ग्रामदैवत महादेव मंदिर परिसरात वृक्ष लागवड तर रायगड वावर्ले तीनघर, बोरगाव, खैराट व महाराष्ट्रातील जिल्ह्यात 2000 शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
कानसा-वारणा फाऊंडेशनने वाढदिवसा निमित्ताने हाती घेतलेला सामाजिक उपक्रम यशस्वीपणे पार पाडल्याने नागरिकात फाऊंडेशनच्या सामाजिक उपक्रमाबाबत सर्व स्तरातून कौतुक होत आहे.