Friday , September 22 2023

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात पदवी वितरण

खारघर : रामप्रहर वृत्त : खारघर येथे रामशेठ ठाकूर महाविद्यालयाचा पदवी वितरण सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून प्रा. डॉ. एलिझावेथ मश्युज् उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.  मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून उपस्थितांचा सत्कार महाविद्यालयातर्फे करण्यात आला.प्राचार्य डॉ. एस. टी. गडदे, उपप्राचार्य शरदकुमार शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविद्यालयातील कॉमर्स व सायन्स विभागातील तृतीय वर्षातील सर्व  विद्यार्थ्यांना पदवी वितरण करण्यात आले.कार्यक्रमास सर्व विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला. सूत्रसंचालन प्रा. रित थुळे यांनी केले, तर आभार पदवी वितरण सोहळ्याच्या सनन्वयिका प्रा. अमृता साळवे यांनी मानले. याच कार्यक्रमात अ‍ॅल्यिुमिनीमिट हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी प्रा. अंजली पौलसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या उपक्रमाचे कॉलेजचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख यांनी कौतुक केले.

Check Also

दिड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन

अलिबाग ः प्रतिनिधी फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा दणदणाट, लेझीम पथके तसेच गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात अवघ्या …

Leave a Reply