Breaking News

प्रश्नमंजुषा, स्फूर्तिगीत स्पर्धेला प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त : नववर्ष स्वागत समितीच्या वतीने नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पनवेल शहरामध्ये शोभायात्रेचे आयोजन करण्यात येत असते. त्या अंतर्गत विविध स्पर्धा घेण्यात येत असून, शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा आणि स्फूर्तिगीत स्पर्धा रविवारी आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

नववर्ष स्वागत समिती गेली 25 वर्षे मराठी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पनवेल शहरामध्ये शोभायात्रेचे आयोजन करीत असते. दरवर्षीप्रमाणे यंदाही शोभायात्रा काढण्यात आली होती, तसेच यानिमित्ताने जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी गेली काही वर्षे विविध स्पर्धा घेण्यात येत आहेत. यंदा स्फूर्तिगीत, गायन स्पर्धा, प्रश्नमंजुषा, रांगोळी स्पर्धा, सेम टू सेम, वेशभूषा अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पनवेल शहरातील व्ही.के. हायस्कूल, आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके. सी.टी. ठाकूर, कुरळकर महापालिका शाळांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या वेेळी समितीचे अध्यक्ष अमित ओझ्रे, अध्यक्षा सुनीता खरे, सचिव अविनाश  कोळी, डी. जी. शिंदे, यश शिलंगाकर, प्रशांत राजे, सुनील भगत, योगेश रानडे, प्रदीप पाटील, संदीप लोंढे, मकरंद बापट, सतीश बिलकर, तेजस वाडकर, सोनाली शेठ, आदिती ओसे, ज्योती कानिटकर, स्वामी कोती, अर्चना राजे, संज्योत मुजुमदार, शीतल सनडे, विशाखा मोडक, नगरसेविका मुग्धा लोंढे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply