Breaking News

म्हसळ्यात श्री धावीर देव मंदिर वर्धापन दिन

म्हसळा : प्रतिनिधी : येथील ग्रामदेव श्री धावीर देव मंदिराचा तिसरा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. सकाळी उपाध्यक्ष नंदू गोविलकर यांच्या हस्ते श्री धावीर देवाची षोड्शोपचार पूजा करण्यात आली. या वेळी अध्यक्ष सुभाष ऊर्फ बाळ करडे यांच्यासह विश्वस्त मंडळी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

सकाळी मंदिरापासून श्री धावीर देवाची पालखी व शोभायात्रा काढण्यात आली. शहरातील ब्राह्मण आळी, जैन कॉलनी, साळीवाडा, कुंभारवाडा, एसटी स्टँड, पोलीस लाईन, जैन मंदिर, बाजारपेठ, सोनार आळी, तांबट आळी, जगन्नाथ शंकर शेट मार्गे ही पालखी श्री धावीर देव मंदिर पटांगणात आणण्यात आली. शोभायात्रेत भाविक श्री धावीर देवाचा जयघोष करीत होते. श्रीवर्धन येथील शिवब्रह्म ढोल ताशा पथक व त्या तालावर नाचणार्‍या महिलांचे पथक या शोभायात्रेत सहभागी झाले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अपर्णा ओक, सुलभा करडे, मीनल ढवळे, भक्ती करडे, गौरी पोतदार, ज्योती करडे, दीपाली हेगिष्टे, निलीमा पोतदार, प्रक्षा खुळे, चैताली करडे, भाविका पोतदार, अनिता करडे, ज्योती करडे, रेखा धारिया, कल्पिता करडे, निमिषा हेगिष्टे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply