Breaking News

ऐतिहासिक राम मंदिराचे आज भूमिपूजन; देशभरात उत्साह

अयोध्या : वृत्तसंस्था

अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांचे मंदिर उभारणीचा भूमिपूजन सोहळा बुधवारी (दि. 5) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सज्ज झाली असून, संपूर्ण देशवासीयांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे.

भूमिपूजन सोहळ्यात मुख्य मंचावर पंतप्रधान मोदी यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राम मंदिर ट्रस्टचे प्रमुख महंत नृत्य गोपालदास उपस्थित असतील. या सोहळ्याचे पहिले निमंत्रण अयोध्या प्रकरणात मुस्लिम पक्षकार इक्बाल अन्सारी यांना पाठविण्यात आले आहे. अन्सारी यांच्यासह अन्य पक्षकार हाजी महबूब यांना तसेच बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणारे पद्मश्री मुहम्मद शरीफ यांनादेखील निमंत्रण देण्यात आले आहे. प्रभू रामाच्या मंदिर उभारणीच्या सोहळ्याला सोमवारी गणेश पूजनाने सुरुवात झाली. मंगळवारी सकाळी रार्मचा पूजन आणि सायंकाळी शरयू तीरावर दीपोत्सव झाला. भूमिपूजनाचा मुख्य सोहळा बुधवारी होणार आहे. या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सीसीटीव्ही, राखीव दल, वाहतूक पोलिसांच्या तुकड्या रस्त्या-रस्त्यावर तैनात करण्यात आल्या आहेत.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply