कर्जत : बातमीदार
माथेरान परिसरात पावसाळ्यात होणार्या आपत्कालीन घटनांवर तात्काळ कार्यवाही करता यावी, यासाठी नगर परिषद कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.
पावसाळ्यात माथेरान परिसरात झाडे कोसळणे, भुस्खलन होणे, दरडी कोसळणे, वीजवाहिन्या तुटणे, आदी घटना घडत असतात.
काहीवेळा घोड्यांचे होत असतात. अशावेळी मान्सून आणि आपत्तीच्या घटनांची माहिती मिळावी आणि त्यावर तात्काळ कार्यवाही करता यावी तसेच आपद्ग्रस्तांना सत्वर मदत मिळावी, यासाठी माथेरान नगर परिषद कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्ष सुरू करण्यात आला आहे.
सतत पाऊस सुरु राहिल्यास माथेरानमधील समाजमंदिर, शाळा, आणि कम्युनिटी सेंटर येथे नागरिकांची तात्पुरत्या निवार्याची सोय करण्याचे नियोजन नगरपालिकेने केले आहे.
पालिकेच्या मुख्यालयात सुरू करण्यरात आलेला आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 तास कार्यरत राहणार आहे.
माथेरान नगरपालिका कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्ष सुरू करण्यात आला तो 24 तास कार्यन्वित राहणार आहे. आपत्तीची माहिती देण्यासाठी मात्र जागरूक राहुल पालिकेला सहकार्य करावे.
-सुरेखा भणगे-मुख्याधिकारी, माथेरान नगरपालिका