Breaking News

भारत विकास परिषदेच्या पनवेल शाखेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त

भारत विकास परिषदेच्या पनवेल शाखेचे उद्घाटन रविवारी (दि. 22) सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि परिषदेचे राष्ट्रीय सचिव सुरेश जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. नवीन पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.

या सोहळ्यास पनवेल महापालिकेचे उपमहापौर विक्रांत पाटील, तसेच संजय खेमानी, दिनेश गुप्ता, प्रांत अध्यक्ष शरद माडीवले, सचिव महेश शर्मा, गगन पांडे, खजिनदार भीमजीभाई रुपानी, पनवेल विधानसभा विस्तारक अविनाश कोळी आदी उपस्थित होते.

या वेळी पनवेल शाखेच्या अध्यक्षपदी गिरीश समुद्रा, सचिवपदी दीपक जांबेकर व खजिनदारपदी नितीन कानिटकर यांची निवड करण्यात आली.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply