नवी मुंबई ः बातमीदार
नवी मुंबई हे कॉस्मोपोलिटन शहर असल्याने विविध जातीधर्माचे व प्रांतातील नागरिक येथे राहत आहेत. त्यामुळे पालिकेने लॉकडाऊन, कोविड व नव्या नियमांच्या संदर्भातील परिपत्रक मराठीसोबतच इंग्रजीतही द्यावे. अनेक अमराठी नागरिकांना पालिकेच्या मराठीतील परिपत्रकाचा अर्थ कळत नाही. त्यामुळे अनेकदा माहिती पोहचत नसल्याने नागरिकांचा गोंधळ उडतो.मुंबई महापालिकादेखील मराठी व इंग्रजीत माहितीपत्रक काढते. नवी मुंबई महापालिकेनेदेखील दोन्ही भाषांमध्ये परिपत्रक काढल्यास नागरिकांचा गोंधळ उडणार नाही, अशी मागणी भाजपच्या नगरसेविका दिव्या गायकवाड यांनी आयुक्तांकडे केली आहे.