आमदार महेंद्र थोरवे; शहर शिवसेनेकडून सत्कार
खोपोली ः प्रतिनिधी
खालापूर मतदार संघात शिवसेना युतीने विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळविल्या नंतर शिवसेनेत आनंदाचे वातावरण असल्याने खोपोली शहर शिवसेनेच्या वतीने नवनिर्वाचित आमदार महेंद्र थोरवे यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित केला होता यावेळी शिलफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून खोपोली शहरा पर्यत मोटार सायकल रॅली काढण्यात आली यावेळी सत्काराला उत्तर देताना सत्कार हा सत्कार्याचा आहे तुम्ही मतदान करून सत्कार्य केले आहे त्याची परतफेड विकास कामांच्या माध्यमातून मी करणार आहे 15 वर्ष या खोपोली शहरातील विकास कुटलेला आहे त्याचा बॅकलोक भरून काढून खोपोली शहराला विकास कामामध्ये झुकते माप देऊन कर्जत खालापूर महाराष्ट्र नंबर एक चा मतदार संघ बनविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे आमदार महेंद्र थोरवे यांनी आपल्या विचारातून उपस्थित जनसामुदायला संबोधित केले आहे
15 वर्षाच्या कालखंडा नंतर शिवसेनेचा भगवा कर्जत खालापूर मतदार संघावर फडकल्याने आमदार महेंद्र थोरवे यांचा खोपोली शिवसेना शहर यांच्या वतीने भव्य काढून सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी शिवसेना शहर प्रमुख तथा गटनेते सुनील पाटील जिल्हा सल्लागार विजय पाटील माजी उपाध्यक्ष नगरसेवक राजू पाटील उपनगराध्यक्षा विनिता कांबळे नगरसेवक अमोल जाधव नगरसेविका माधवी रिठे प्रमिला सुर्वे ,अर्चना पाटील महिला शहर प्रमुख प्रिया जाधव शिलफाटा महिला आघाडीच्या प्रमुख मनीषा खेडकर सोनिया रुपवते युवासेना प्रमुख संतोष मालकर राजन सुर्वे जनार्धन थोरवे दिलीप पुरी यांच्यासह आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते या वेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहर प्रमुख सुनील पाटील यांनी करताना खोपोली शहरात मतदारांची चांगली साथ लाभली युती मध्ये असणार्या पक्षांनी ही मोलाची कामगिरी करून थोरवे यांना सात हजार मतांची आघाडी दिल्याने आभार व्यक्त करीत आगामी काळात खोपोली शहरासाठी विकासकामांना जादा निधी द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी उपनगराध्यक्षा विनिता कांबळे ,राजन सुर्वे मनीषा खेडकर माधवी रिठे व सहासपंर्क प्रमुख विजय पाटी यांनी आपले विचार व्यक्त करताना निवडणुकीच्या काळात विरोधी पक्षाच्या नेत्यांनी महेंद्र थोरवे यांच्यावर गुंडगिरीचा आरोप केला मात्र मतदारांनी त्यांच्या आरोपाला भीक न घालता मागच्या वेळेस 1900 मतांनी निसटता पराभवाचा काढीत 19 हजाराची आघाडी देऊन विरोधकांना जागा दाखवून दिली या पुढे खालापूर तालुक्यासह खोपोली शहराचा विकासाचा आलेख मतदारांच्या मनासारखा होईल या शंका नसल्याचे पाटील यांनी सांगितले.
या वेळी नवनिर्वाचित आमदार महेंद्र थोरवे यांनी आपले विचार व्यक्त करताना जनतेने दिलेला कौल हा विकासासाठी आहे त्यास मी प्रामाणिक प्रयत्न करून पात्र ठरवेन जनतेचा आवाज विधानसभेत उठवून मतदार कायापालट करून सर्वसामन्य जनतेची सेवा करणार असल्याचे सांगून पेन अर्बन बँकेच्या 90 हजार खातेदारांच्या प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न राहील व खर्जत खालापूर मतदार संघ विकास कामामध्ये प्रथम क्रमांक असेल त्याच अनुषंगाने निवडणुकीला सामोरे जाताना दोन्ही तालुक्यातील विकासाची बाराखडी डोळ्यासमोरच ठेवून सामोरे गेलो आहे त्यामुळे आगामी काळात कर्जत खालापूरचा विकास झालेला दिसेल यात शंका नसल्याचे थोरवे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.