खोपोली ः प्रतिनिधी
अयोध्येत बुधवारी (दि. 5) राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा संपन्न होत असल्याच्या पार्श्वभूमीवर खोपोलीतही खोपोली भाजप, विहिंप व रा. स्व. संघातर्फे श्रीराम प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम कौटुंबिक व साधेपणाने साजरा करण्यात आला.
माजी आमदार देवेंद्र साटम, शहर भाजप अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, जिल्हा महिला अध्यक्ष अश्विनी पाटील, रा. स्व. संघ तालुका संघचालक राकेश पाठक, कार्यवाह अविनाश मोरे, रोहित कुलकर्णी, विहिंप जिल्हामंत्री रमेश मोगरे, न पा. परिवहन सभापती तुकाराम साबळे, शहर सरचिटणीस हेमंत नांदे, ईश्वर शिंपी, जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत पुरी, सूर्यकांत देशमुख, कोषाध्यक्ष राकेश दबके, युवा अध्यक्ष अजय इंगुळकर, शहर महिला अध्यक्ष शोभा काटे, पदाधिकारी सुमिती महर्षी, जिल्हा नेते सचिन मोरे, विजय तेंडुलकर, शहर पदाधिकारी प्रमोद पिंगळे, रा. स्व. संघाचे सुधाकर भट, महिला आघाडीच्या स्वाती बीवरे, युवा मोर्चाचे सिद्धेश पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी श्रीराम प्रतिमेचे पूजन केले.
दरम्यान, याच वेळी रामजन्मभूमी आंदोलनात सहभागी झालेल्या कारसेवक अॅड. राजेंद्र येरुणकर, रमेश मोगरे, दिनेश फराट, माजी नगरसेवक राजेंद्र फक्के आदींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या समारोपाला माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसूरकर यांची उपस्थिती लक्षणीय ठरली. त्यांनीही श्रीराम प्रतिमेचे पूजन केले.