पनवेल : रामप्रहर वृत्त – बुधवारी सुसाटयाच्या वार्यासह पनवेल परिसरात मुसळधार पाऊस झाला. यामुळे कळंबोली परिसरात वृक्षांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. या कारणाने काही ठिकाणी रस्ते अडवले गेले होते. दरम्यान आमदार प्रशांत ठाकूर यांनी कळंबोलीचा दौरा करुन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी सिडको आणि महापालिका प्रशासनाला सूचना दिल्या.
मंगळवारी रात्रीपासून पनवेल परिसरात पावसाने धुवाधार बॅटिंग केली. गुरुवारी सकाळी उघडीप घेतली असली तरी. बुधवारी सोसाट्याच्या वार्यासह पाऊस कोसळला. या कोसळदार वादळी पावसात कळंबोली परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष उन्मळून पडले. काही ठिकाणी वाहनांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र कित्येक ठिकाणी रस्त्यावर झाडे पडल्याने रहदारीला अडथळा निर्माण झाला. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने ते बाजूला करण्यात काहीसा वेळ गेला. कळंबोली उद्भवलेल्या या परिस्थितीची आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी सकाळी पाहणी केली. त्यांच्यासमवेत स्थानिक नगरसेवकांसह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, बुधवारी वीज पुरवठा सुद्धा खंडीत झाला होता. याबाबतही आमदार प्रशांत ठाकूर यांनी महावितरणच्या अधिकार्यांकडून माहिती घेतली. आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत संबंधित यंत्रणांनी सज्ज राहण्याबाबतच्या सूचनाही त्यांनी दिल्या. त्यांच्यासमवेत स्थायी समितीचे माजी सभापती नगरसेवक अमर पाटील आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.