Breaking News

जागरूक आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांची कार्यतत्परता

कळंबोली : वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात झाडे पडली आहेत. या पार्श्वभूमीवर कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी पाहणी करून वीज अभियंत्यांना आवश्यक त्या सूचना केल्या. त्याचप्रमाणे आपल्या टीआयपीएल कंपनीतर्फे जेसीबी व डम्पर मदतीसाठी उपलब्ध करून दिले. या पाहणी दौर्‍यावेळी नगरसेवक अमर पाटील, भाजप शहर मंडल उपाध्यक्ष दिलीप बिस्ट, प्रभाग आठचे अध्यक्ष प्रकाश शेलार सोबत होते.

उरण : आमदार महेश बालदी यांनी बुधवारी भरपावसात रस्त्यावर उतरून पाहणी केली आणि नागरिकांना धीर दिला. अशातच शासकीय दवाखान्यात काही इमरजन्सी असल्याचे कळताच क्षणाचाही विलंब न करता त्यांनी छातीभर पाण्यातून दवाखान्यात जाऊन तेथील परिस्थिती जाणून घेतली. त्याचप्रमाणे रस्त्यावर एक बंद बस पडली असता, तिला धक्का मारायलाही ते सरसावल्याचे पहावयास मिळाले. या कार्यतत्परतेबद्दल दोन्ही आमदारांचे नागरिकांमधून कौतुक होत आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply