Breaking News

पोलीस असल्याची बतावणी करणार्‍या दोघांना अटक

पनवेल : बातमीदार

आपण पोलीस आहोत असे बतावणी करून दोन वेगवेगळ्या घटनांत नागरिकांची फसवणूक करणार्‍या दोन आरोपींना कळंबोली पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.बुलेटवरून आलेल्या दोघा इसमांनी तैबुर बासीद अली (वय 30 वर्षे) व शहाजहान अली यांच्याकडून पोलीस असल्याचे सांगून त्यांची पर्स घेतली व तुम्ही ओळखपत्र दाखवून तुमची पर्स न्या असे सांगितले होते. त्यानंतर दोघेही ओळखपत्र घेऊन पुन्हा कळंबोली सर्कल येथे आले असता, ते इसम दिसले नाहीत. या पर्समध्ये 5 हजार 400 रुपये व हजेरी कार्ड होते. दुसर्‍या घटनेत गुलाबराव अभिमान पाटील (वय 42 वर्षे) यांच्याकडील लायसन्स पोलीस असल्याचे सांगून दोघेही घेऊन गेले होते. याबाबतचे गुन्हे दाखल होताच कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड व त्यांच्या पथकाने तपास करून आकाराम जयराम आलदर (38, कळंबोली) व दशरथ शहाजी जाधव (30, कळंबोली) या आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून लायसन्स, पाच हजार रुपये व ओळखपत्र हस्तगत करण्यात आले आहे.

Check Also

पनवेलमध्ये भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्तजगातील सर्वात जास्त सदस्य असलेल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस सोमवारी (दि. …

Leave a Reply