Breaking News

मुरूडमध्ये रंगला आगळावेगळा रानभाजी महोत्सव

मुरूड : प्रतिनिधी – मुरूड तालुका कृषी अधिकारी कार्यालय व पंचायत समिती यांच्या विद्यमाने कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत जागतिक आदिवासी दिनानिमित्त पंचायत समितीच्या सभागृहात रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

या महोत्सवात नथुराम वाघमारे व सोमनाथ वाघमारे या आदिवासी बंधूंच्या सहाय्याने रानभाज्यांची आकर्षकपणे मांडणी करण्यात आली होती. यामध्ये कुडा, टाकळा, खवणी, भारंबा, कंटोळी, पेवा, खडक चिरा, आंबटी, दिडा आदी रानभाज्यांचा समावेश होता.

महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास मुरूड तालुका गटविकास अधिकारी राजेश कदम, तालुका कृषी अधिकारी व्ही. डी. अहिरे, ए. जी. धिवरे, सुभाष वाणी, एस. ए. भंडारी, मनोज कदम, सुनील निंभोरे आणि शेतकरी बांधव उपस्थित होते.

प्रास्ताविकात तालुका कृषी अधिकारी व्ही. डी.आहिरे यांनी निसर्गात उपलब्ध असणार्‍या रानभाज्यांचे मानवी जीवनातील महत्त्व अधिक असल्याचे सांगून कोणतेही खत वा कीटकनाशक न वापरता पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने उगवलेल्या या रानभाज्यांमध्ये औषधी गुणधर्म असल्याने शहरी भागातील लोकांनी त्यांचे सेवन करण्याचे आवाहन केले.

गटविकास अधिकारी राजेश कदम यांनी सेंद्रीय स्वरूपात या भाज्या उपलब्ध होत असून, आरोग्यवर्धक भाज्यांमधील गुणतत्त्वे ओळखून त्यांचा आहारात समावेश करावा, असे सूचित केले.

या वेळी महोत्सवास उपस्थित राहिलेल्यांना रानभाज्यांचे वाटप करण्यात आले.

Check Also

संघटनात्मक बांधणी ही भाजपची ताकद

युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांचे प्रतिपादन पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाची ताकद …

Leave a Reply