Saturday , June 3 2023
Breaking News

कळंबोलीतील विशाखा कुरूप ठरल्या ‘फेस ऑफ दि इयर’

पनवेल : वार्ताहर

कळंबोली येथे राहणार्‍या विशाखा अरुण कुरूप हिने जयपूर येथे आयोजित स्पर्धेत मिस इंडिया 2021चा फेस ऑफ दि इयर हा पुरस्कार पटकाविला. त्यामुळे त्यांचे नाव देशभरात पोहचले आहे.

जयपूर येथे फॉरेव्हर स्टार इंडिया अ‍ॅवॉर्ड्सच्या माध्यमातून हॉटेल मेरिएटमध्ये नॅशनल लेव्हलवर चार दिवसीय मेगा ब्युटी आणि अ‍ॅवॉर्ड या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्रातून विशाखा अरुण कुरूप हिने फॉरेव्हर मिस इंडिया 2021 स्टेट कॅटेगरीमध्ये फेस ऑफ दि इयर हा पुरस्कार पटकावला आहे. या चार दिवसांमध्ये फॉरेव्हर मिस व मिसेस इंडिया याचा ग्रँड फिनाले फॉरेव्हर फॅशन विक व अ‍ॅवॉर्डचे आयोजन करण्यात आले होते. यात देशभरातून नामांकित अशा 150पेक्षा जास्त फॅशन डिजायनर्सने आपल्या वेगवेगळ्या क्रिएटीव्ह व युनिक कलेक्शनचे सादरीकरण केले. त्यामुळे या शो ला चारचांद लागले होते. या शोमध्ये मिस व मिसेस इंडिया यांच्यासह पूर्ण देशातील प्रत्येक शहर व राज्यातील विजयी स्पर्धकसुद्धा सहभागी झाले होते. अंतिम दिवशी 70 पेक्षा जास्त कॅटेगरीजमध्ये रिअल सुपरहिरोज व रिअल सुपरवुमन हे अ‍ॅवॉर्डसुद्धा देण्यात आले.

Check Also

शिवराज्याभिषेक दिन दिमाखात साजरा

महाड : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर शुक्रवारी (दि. …

Leave a Reply