Breaking News

भाजप किसान मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी परशुराम म्हसे

कर्जत : बातमीदार

भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हा अध्यक्षपदी कर्जत तालुका मंडल कार्यालयीन प्रमुख आणि प्रगतशील शेतकरी परशुराम म्हसे यांची निवड करण्यात आली आहे. भाजप जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते म्हसे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यांच्यावर तीन विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी असणार आहे. कर्जत तालुक्यातील खैरपाडा येथील रहिवासी असलेले परशुराम म्हसे यांनी वारे ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून काम पाहिले आहे. माजी आमदार देवेंद्र साटम यांचे विश्वासू सहकारी म्हणून ते ओळखले जातात. त्यांना भाजप जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पनवेल येथे नियुक्तीपत्र देण्यात आले. या छोटेखानी कार्यक्रमास जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी, दीपक बेहरे, किसान मोर्चाचे प्रदेश सचिव सुनील गोगटे, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष राहुल वैद्य, भाजप कर्जत तालुका सरचिटणीस राजेश भगत आदी उपस्थित होते.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply