Breaking News

राज्यपालांनी 79व्या वर्षी केला शिवनेरी सर

जुन्नर : प्रतिनिधी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वयाच्या 79व्या वर्षी पायी चालत शिवनेरी किल्ला सर केला. अशी कामगिरी करणारे ते पहिलेच राज्यपाल ठरले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे दर्शन होणे हा माझ्या भाग्याचा क्षण आहे. ते सामान्य व्यक्तिमत्त्व नव्हते, तर अवतारी पुरुष होते. त्यांच्यासारख्या महापुरुषांकडून प्रेरणा मिळते. ते खरे पूजनीय आदर्श आहेत, असे उद्गार राज्यपालांनी या वेळी काढले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रविवारी (दि. 16) शिवनेरीला भेट दिली आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ माँसाहेबांचे दर्शन घेतले. तत्पूर्वी राज्यपालांनी पायीच हा गड सर केला. शिवनेरीवर येण्यापूर्वी अनेकांनी मला तिथे पाऊस आहे. चिखल आहे. शिडी चढून जावे लागेल, असे सांगून घाबरविले होते, परंतु माझी श्रद्धा होती म्हणून मी पायी आलो. शिवजन्मस्थळी आल्यावर महाराजांच्या आयुष्यातील कर्तृत्व प्रवासाकडे ध्यान जाते, असे म्हणत शिवाजी महाराजांचे निष्ठावंत मावळे तान्हाजी मालुसरे, हंबीरराव मोहिते यांचीही आठवण कोश्यारी यांनी काढली.

राज्यपालांसमवेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील, पुरातत्त्व विभागाचे उपअधीक्षक डॉ. राजेंद्र यादव उपस्थित होते. गडावरील शिवाई देवतेची आरती करून त्यांनी दर्शन घेतले. विविध वास्तूंची माहिती घेत गडावरील विविध झाडांची नावे विचारत आणि दिलखुलास गप्पा मारत त्यांनी शिवनेरीचा फेरफटका मारला. शिवकुंज इमारतीतील राजमाता जिजाऊ आणि बालशिवबांच्या प्रतिमेशी ते लीन होऊन नतमस्तक झाले. शिवजन्मस्थळी महाराजांच्या पाळण्याची पूजा करीत तेथील प्रतिमेचे पूजन केले. या वेळी त्यांच्या हस्ते वृक्षारोपणदेखील करण्यात आले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply