Breaking News

एमएसएमई क्षेत्रात पाच कोटी नवे रोजगार निर्माण होणार; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा विश्वास

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेचे चक्र पूर्णपणे थांबले होते. अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर हळूहळू अर्थव्यवस्थेचे चक्र सुरू होताना दिसत आहे. अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. आपल्या देशात एमएसएमई क्षेत्राचे मोठे योगदान आहे. येत्या काळात या क्षेत्रात पाच कोटी नवे रोजगार निर्माण होतील, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. ‘स्वावलंबन ई-समिट 2020’मध्ये ते बोलत होते.

गडकरी म्हणाले, जीडीपी वाढीच्या दरात 30 टक्के उत्पन्न हे एमएसएमई क्षेत्राचे आहे. आतापर्यंत या क्षेत्रात आम्ही 11 कोटी रोजगार निर्माण केले. येत्या पाच वर्षांमध्ये जीडीपी वाढीच्या दरातील एमएसएमई क्षेत्राचे उत्पन्न 30 टक्क्यांवरून 50 टक्के करू आणि निर्यात 48 टक्क्यांवरून वाढवून 60 टक्के करीत पाच कोटी नवे रोजगारही निर्माण करू.

ज्या उद्योगांनी नोंदणी केली नाही त्यांना एमएसएमई क्षेत्रांना मिळणारा फायदा मिळविण्यासाठी सूक्ष्म उद्योगांतर्गत नोंदणी करण्याची आवश्यकता आहे. छोट्या ट्रेडर्सनाही सोबत घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. त्यांना नोंदणीस प्रोत्साहित करण्यासाठी आम्हाला एनजीओच्या मदतीची गरज असल्याचेही गडकरी यांनी नमूद केले.

Check Also

राज्यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या पनवेल महापालिकेला प्रशस्तीपत्र प्रदान

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 150 दिवसांच्या …

Leave a Reply