Breaking News

आत्मनिर्भर भारत सेलचे ऑनलाइन उद्घाटन

अलिबाग : प्रतिनिधी

74 व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शनिवारी (दि.15) डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल विद्यापीठातील आत्मनिर्भर भारत कक्षाचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एका ऑनलाइन कार्यक्रमाद्वारे केले. या वेळी केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल, माहिती व प्रसारण, अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री प्रकाश जावडेकर यांची ऑनलाइन उपस्थिती होती.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल विद्यापीठात आत्मनिर्भर भारतासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केल्याबद्दल कुलगुरू प्रो. वेदला रामा शास्त्री यांचे अभिनंदन केले. ते पुढे म्हणाले, देशातील तरुणांनी मातृभाषेचे महत्त्व समजून घेऊन आपली स्वतःची शक्ती जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. आत्मनिर्भर भारत साध्य करण्यासाठी आत्मविश्वासाची भूमिका पुढे आणावी आणि देशातील तरुणांमध्ये आत्मविश्वास वाढविण्यात आपल्या विद्यापीठांनी मोठी भूमिका बजावावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. शेवटी त्यांनी उपस्थितांना व्यावहारिकदृष्ट्या काम करण्याची खूप गरज असून आत्मनिर्भर भारताचे ध्येय साकारण्यासाठी ’श्रम’ महत्त्वाचे  असल्याचे सांगितले.

विद्यापीठामध्ये आत्मनिर्भर भारत कक्षाची स्थापना हे या दिशेने पहिले पाऊल असून संपूर्ण देशातील सर्व विद्यापीठांमध्ये ही पहिली पायरी असल्याचे सांगून त्यांनी विद्यापीठाच्या आत्मनिर्भर भारत सेलची रचना, पुढील वाटचाल याविषयीची सविस्तर माहिती दिली.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply