माणगाव : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील असंख्य कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे, पण गरीब व गरजूंना घाबरण्याचे कारण नाही, कारण आता आयुष्मान योजनेतंर्गत कोरोना महामारीवर मोफत उपचार होणार आहे. कोरोना झालेल्या नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन भाजप दक्षिण रायगड जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष हेमा मानकर यांनी केले आहे.
मानकर यांनी म्हटले आहे की, 2011मध्ये झालेल्या जनगणनेनुसार द्रारिद्य्ररेषेखाली येत असलेल्या कुटुंबातील सदस्यांना आयुष्मान योजनेचा लाभ घेता येतो. भारतभर ही योजना राबविण्यात येत असल्याने आतापर्यंत भारतात 50 कोटी नागरिक आहेत ज्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंत उपचार घेता येतात, पण त्यासाठी सीईसी केंद्रात किंवा महा ई-सेवा केंद्रात त्यासाठीचे कार्ड बनले जाते किंवा या योजनेत एखाद्याचे नाव आहे की नाही हे कळते.
दुसरीकडे महात्मा फुले जनारोग्य योजनेतंर्गत राज्य शासनाच्या ज्या कुटुंबाकडे केशरी किंवा पिवळे रेशनकार्ड असेल अशा सर्व कुटुंबांना दोन लाखांपर्यंत कोरोना आजारावर मोफत उपचार आता होणार आहेत, तसेच आता सुधारित नियमांमध्ये फक्त कोरोनाच्या काळात पांढरे रेशनकार्डधारकांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे आता सामान्य माणसाला घाबरण्याची गरज नाही, असे मानकर यांनी सांगितले.
Check Also
कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …