अलिबाग ः प्रतिनिधी
जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त रायगड फोटोग्राफर अॅण्ड व्हिडीओग्राफर असोसिएशनशी संलग्न अलिबाग फोटोग्राफर्स अॅण्ड व्हिडीओग्राफर असोसिएशनच्या वतीने अलिबागमधील ज्येष्ठ पत्रकार आणि छायाचित्रकार भाऊ सिनकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी रायगड फोटोग्राफर अॅण्ड व्हिडीओग्राफर असोसिएशनचे खजिनदार जितेंद्र मेहता, अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष समीर मालोदे, उपाध्यक्ष तुषार थळे, खजिनदार राकेश दर्पे, सल्लागार सचिन असराणी, विवेक पाटील, अभिजित काटकर, भूषण पाटील आदी उपस्थित होते. दरवर्षी अलिबाग असोसिएशनच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, वह्यावाटप, दहावी-बारावीत प्रथम क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार, मार्गदर्शन शिबिर असे विविध कार्यक्रम घेऊन जागतिक फोटोग्राफी दिन साजरा केला जातो.