Breaking News

‘फिरत्या वाहनात कृत्रिम तलावांची सोय करा’

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महानगरपालिका हददीत गणेशोत्सवा दरम्यान फिरत्या वाहनात कृत्रिम तलावाची सोय करण्यात यावी, अशी मागणी भाजप नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पनवेल पालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे.

नगरसेविका भोईर यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, यंदाच्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करणे शकय होणार नाही. तसेच घरगुती गणपतींचे विर्सजन करताना तलावाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेने फिरत्या वाहनामध्ये कृत्रिम तलाव तयार करुन ते ठिकठिकाणी नागरिकांच्या भागामध्ये जाऊन त्या ठिकाणी त्यांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याची सोय केलेली असून, त्यामुळे गर्दी न होता विसर्जन करणे शक्य होणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने फिरत्या वाहनात कृत्रिम तलावाची सोय केल्याप्रमाणे पनवेल पालिका हद्दीतही फिरत्या वाहनातील कृत्रिम तलावाची सोय करुन नागरिकांना उपकृत करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply