Breaking News

विसपुते महाविद्यालयात वेबिनारला प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त

भारताचा 74व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त कोरोना महामारीमध्ये सुद्धा हा कार्यक्रम झूम अ‍ॅप व फेसबुक च्या माध्यमातून आत्मनिर्भर भारत- युवा महासंवाद 15 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 11 वाजता ऑनलाइन आयोजित केला होता.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शिंदखेडा विधासभेचे आमदार जयकुमार रावळ, आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन धनराज विसपुते, महेंद्र विसपुते व संचालिका संगीता विसपुते तसेच महाराष्ट्रातील 50  शाखांमधील सर्व प्राचार्य, विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. बी. एड, एम. एड. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सीमा कांबळे यांनी पाहुण्यांच्या मार्गदर्शनाचा सारांश सांगितला. यावेळी अनेक जिल्ह्यातील म्हणजेच  धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, बुलढाणा, रत्नागिरी, औरंगाबाद, मुंबई, नवी मुंबई हे लोक मोठ्या संख्खेने सहभागी झाले.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply