Breaking News

ड्रग्ज प्रकरणातील आरोपीची क्वारंटाइन सेंटरमध्ये आत्महत्या

खारघर, पनवेल ः बातमीदार
खारघरमध्ये क्वारंटाइन असलेल्या एका आरोपीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ड्रग्ज बाळगल्याच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेल्या महम्मद सुलेमान याने क्वारंटाइन सेंटरमध्ये गळफास घेतला. गेल्या काही महिन्यांतील आरोपींच्या आत्महत्येची ही तिसरी घटना आहे.
तळोजा जेलमधील कैद्यांना कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी खारघरच्या गोखले हायस्कूलमध्ये विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी अनेक कैदी क्वारंटाइन करण्यात आले आहेत. महम्मद सुलेमान चार दिवसांपासून येथे क्वारंटाइन होता. दिल्लीतील एनडीपीएस ड्रग्ज प्रकरणात त्याचा सहभाग होता. पोस्टमार्टमसाठी त्याचा मृतदेह जे. जे. रुग्णालयात नेला असल्याची माहिती आहे. महम्मद सुलेमानच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, खारघर पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply