Breaking News

भाजप महिला मोर्चाची बैठक उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त

खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात बुधवारी (दि. 28) भाजप उत्तर रायगड जिल्हा महिला मोर्चाची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रदेश संघटनेकडून आलेल्या विविध विषयांबाबत चर्चा व कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले.

ही बैठक भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी यांच्या उपस्थितीत, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष अश्विनी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीस पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, उरणच्या नगराध्यक्ष सायली म्हात्रे, पनवेल पंचायत समिती सदस्य तथा महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, पनवेलच्या माजी महापौर व महिला मोर्चा समन्वयक चारुशीला घरत, प्रदेश सदस्य दर्शना भोईर, म. मो. स. मि.कोकण विभाग प्रमुख गायत्री परांजपे, जिल्हा उपाध्यक्ष संध्या शारबिद्रे, जिल्हा पदाधिकारी, कार्यकारणी सदस्य, मंडल अध्यक्ष, मंडल सरचिटणीस आदी उपस्थित होते.

या बैठकीला उत्तर रायगड जिल्ह्यातील महिला मोर्चाच्या नऊ मंडलातील संघटनात्मक कामांचा आढावा व संघटनात्मक कामांवर विस्तारित चर्चा झाली. या वेळी प्रदेश संघटनेतून आलेल्या कार्यक्रमांचे नियोजन व नवनिर्वाचित जिल्हा पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या बैठकीसाठी उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस मृणाल खेडकर, प्रिया मुक्कादम यांनी सहकार्य केले.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply