Breaking News

शासनाच्या सुचना पाळून गणोशोत्सव साजरा करा

अलिबाग ः प्रतिनिधी
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव आणि मोहरम साजरा केला जात आहे. शासनाने केलेल्या सूचनांचे पालन करूनच हे उत्सव साजरे करावेत. गर्दी करू नका. मिरवणुका काढू नका. घरातच विसर्जन करा, असे आवाहन रायगड जिल्हा प्रशासनातर्फे नागरिकांना करण्यात आले आहे.
गणेशोत्सव व मोहरमच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि. 20) जिल्हा प्रशासनाने फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून रागगडकरांशी संवाद साधला. जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकरी डॉ. किरण पाटील या लाइव्हमध्ये सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी निधी चौधरी म्हणाल्या की, रायगड हा मुंबईच्या जवळचा जिल्हा आहे. त्यामुळे रायगडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त होईल, अशी भीती व्यक्त केली जात होती, परंतु रायगडकरांनी केलेल्या सहकार्यामुळे आपण कोरोनाला रोखून धरू शकलो. असेच सहकार्य गणेशोत्सव आणि मोहरम हे दोन सण साजरे करताना करावे.
स्वच्छतेकडे लक्ष द्या. ओला व सुक्या कचर्‍याचे नियोजन करा. जर लक्षणे आढळली तर ताबडतोब चाचणी करून घ्यावी, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले.
पनवेलमधून रायगड जिल्ह्यातील इतर तालुक्यांत जाण्यासाठी ई-पास आवश्यक
पनवेल हे एमएमआर विभागात मोडत असल्याने तेथून रायगड जिल्ह्यातील इतर तालुक्यांत जाण्यासाठी ई-पास आवश्यक असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी या वेळी स्पष्ट केेले. गणेशोत्सव तसेच मोहरम साजरा करा, परंतु गर्दी करण्याचे टाळा. आपल्या सण-उत्सवांना गालबोट लागणार नाही याची काळजी घ्या, असे आवाहनही पारसकर यांनी जिल्ह्यातील जनतेला उद्देशून केले.

गणेशोत्सवासाठी जे लोक गावात येतील त्यांची चाचणी गाव समितीने करून घ्यावी. लक्षणे आढळलेल्यांवर उपचार करून घ्या.
-निधी चौधरी, जिल्हाधिकारी, रायगड

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply