Breaking News

रो-रो बोट अखेर मांडवा बंदरात दाखल

अलिबाग : प्रतिनिधी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेली बहुचर्चित मुंबई भाऊचा धक्का ते मांडवा रो-रो बोटसेवा गुरुवारी (दि. 20) सुरू झाली. 26 कार, नऊ दुचाकी आणि 206 प्रवासी घेऊन पहिली बोट भाऊचा धक्का येथून निघाली आणि व्यवस्थितपणे मांडवा टर्मिनल्स येथे पोहोचली.  
केंद्र सरकारच्या भारतमाला योजनेंतर्गत साकारल्या गेलेल्या या रो-रो सेवेचे उद्घाटन फेब्रुवारी महिन्यात करण्यात आले होते, मात्र कोरोनामुळे ही सेवा बंद करण्यात आली. त्यामुळे ही बोटसेवा कधी सुरू होणार याची प्रतीक्षा होती. अखेर गुरुवारपासून रो-रो बोटसेवा प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली. सकाळी 9.15 वाजता भाऊचा धक्का येथून प्रवासी व वाहनांना घेऊन प्रोटोपोरस नावाची बोट निघाली आणि 10.15 वाजता मांडवा बंदरात दाखल झाली.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply