Breaking News

बंगाली मिठाईला खवय्यांची पसंती

पनवेल : बातमीदार

गणरायाची आराधना करताना नैवद्य म्हणून मोदकांप्रमाणेच बंगाली मिठायांचा वापर करण्याचे प्रमाण गणेशोत्सवात वाढले आहे. या बंगाली मिठाईचे भाव 10 टक्क्यांनी वाढले आहे. या मिठायांमध्ये सुका मेवा, वेगवेगळे फ्लेवर्स, पेढ्यापासून काजुकतलीपर्यंत विविध प्रकार बाजारात उपलब्ध झाले आहेत. त्याचप्रमाणे बंगाली मिठाईही ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे.

गणपतीचे आवडते खाद्य मोदक दरवर्षी गणेशोत्सवात मराठमोळ्या घरांमध्ये उकडीचे किवा तळणीचे मोदक होतात. पण आता तयार मोदकांकडे कल वाढू लागला आहे. चॉकलेट, मावा, सुका मेवा अशा पदार्थांपासून केलेल्या मोदकांनाही पसंती मिळत आहे. बंगाली मिठाईही त्यात ग्राहकांना आवडू लागली आहे. मोदकांबरोबरच मोतीचूर लाडू, कंदी पेढा, बागडी पेढा आदी प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. या मिठाईलाही ग्राहकांची पसंती आहे. केशरी मावा मोदक, काजू मोदक, अंजीर किंवा बटरस्कॉच मोदक, कंदी मावा मोदक आदी प्रकारही विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे. 400 ते 800 रुपये किलो दराने ते बाजारात उपलब्ध आहेत. मलाई मोदकांमध्ये पिस्ता, स्टॉबेरी, अंजीर, रोज फ्लेवर्स आहेत. काजू मोदकांमध्ये काजूसोबत केशर, केवडा, गुलाब, खस यांचे अर्क मिसळलेले आहेत. हे मोदक 800 ते 1000 रुपये किलो दराने मिळत आहेत. साखर आणि गुळाच्या किंमतीत वाढ झाल्याने तसेच वाहतुकीच्या खर्चामुळे यंदा मिठाईच्या किंमतीत दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे, असे विक्रेत्यांनी सांगितले.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply