Breaking News

नियमांचे पालन करून दीड दिवसाच्या बाप्पांना निरोप

नवी मुंबई, पनवेल : बातमीदार

गणेश चतुर्थीला झालेल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनानंतर दीड दिवसाच्या बाप्पाला नियमांचे पालन करुन निरोप दिला. कोरोनामुळे सायंकाळी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन अनेकांनी दुपारपासूनच बाप्पांना निरोप देण्यास सुरुवात केली.

कोरोनामुळे सामाजिक अंतर राखून व सुरक्षिततेचे नियम पाळण्यात येत होते.  कोरोनामुळे यंदा पालिकेने शहरात 135 कृत्रिम तलाव तयार केले आहेत. या कृत्रिम तलावाभोवती देखील बघ्यांची गर्दी होती. मोठ्या मूर्तींचे विसर्जन मोठया तलावांत करण्यात आले. तर लहान घरगुती मूर्तींचे कृत्रिम तलावात. नवी मुंबईतील अनेक सामाजिक संघटनांनी व कार्यकर्त्यांनी गणपती विसर्जनस्थि व्यवस्था केली होती. वाशीतील दशरथ भगत यांनी  ’विसर्जन तलाव आपल्या दारी’ हा उपक्रम राबवला. कोरोनामुळे दक्ष नागरिकांनी या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद दिला. ऐरोलीत भाजपचे राहुल शिंदे यांनी देखील ही व्यवस्था केल्याचे दिसून आले. दरवर्षी नवी मुंबईतील नेते आपल्या कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतात. मात्र कोरोना साथ रोगामुळे नेत्यांनी ऑनलाइन दर्शन घेतले. आमदार गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे यांनी कार्यकर्त्यांना स्वतःहून व्हिडीओ कॉलकरून ऑनलाइन दर्शन घेतले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply