Breaking News

नेरळमध्ये 51 जणांना केले होम क्वारंटाइन

कर्जत : बातमीदार

नेरळ येथील कोरोनाग्रस्त तरुणाच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आलेल्या 51 जणांना आरोग्य विभागाने होम क्वारंटाइन केले आहे. ठाणे येथील रुग्णालयात दाखल असलेल्या या तरुणाच्या राहत्या घरापासून आजूबाजूला असलेल्या 360 कुटुंबांचे

सर्वेक्षण आरोग्य विभागाच्या सहा पथकांनी पूर्ण केले.

नेरळ येथे राहणारा तरुण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरण लागू करून परिसर सील केला तसेच या तरुणाची आई, पत्नी आणि दोन मुले तसेच चालक अशा पाच जणांना खारघर येथील ग्रामविकास भवनमध्ये ठेवण्यात आले आहे. त्या पाचही जणांची कोरोना टेस्ट 21 एप्रिल रोजी घेण्यात आली असून त्यांचे अहवाल अद्याप आरोग्य विभागाला प्राप्त झाले नाहीत, पण या तरुणाच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आलेल्या 51 जणांना आरोग्य विभागाने शिक्के मारून होम क्वारंटाइन केले आहे.

याचबरोबर कर्जत तालुक्यातील नेरळ, खांडस, आंबिवली, कडाव आणि कळंब या प्राथमिक आरोग्य केंद्रांतील कर्मचार्‍यांनी कोरोनाच्या हॉटस्पॉट परिसरातील 360 घरांतील नागरिकांची भेट घेऊन सर्वेक्षण केले. त्यात कोणी बाहेरून आले आहे काय? कुणाला सर्दी, खोकला वा ताप आहे का? याची माहिती घेऊन अन्य आजारांचे सर्वेक्षण आरोग्य पथकांनी केले. तब्बल 1460 नागरिकांचे सर्वेक्षण केले गेले असून तो अहवाल तालुका आरोग्य अधिकार्‍यांना पाठवण्यात आला आहे.

याशिवाय नेरळ परिसरातील बिर्हाणी पार्कमध्ये आठ, रायगड हॉस्पिटलमध्ये तीन, नेरळ गावात वसई आणि गुजरात येथून आलेले चार अशा 15 जणांनादेखील होम क्वारंटाइन करण्यात आलेे आहे.

आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणाच्या आदेशाने नेरळमध्ये कोरोनाबाबत आम्ही काळजी घेतली आहे. आरोग्य कर्मचारी कुठेही कमी पडू नयेत यासाठी सक्त सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी सहकार्य करावे. -डॉ. सुधाकर मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी

Check Also

जनहितासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा नेहमीच पुढाकार -मंत्री गणेश नाईक

आमदार प्रशांत ठाकूर व परेश ठाकूर संस्कारी असल्याचेही गौरवोद्गार पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर …

Leave a Reply