Breaking News

शारजाह-जेएनपीटी मालवाहतूक मार्ग

उरण : प्रतिनिधी

भारतातील प्रमुख कंटेनर पोर्ट असलेले जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) मैत्रीपूर्ण संबंध असणार्‍या शेजारील देशांमध्ये व्यवसायातील नवीन पुढाकाराने प्रगतीचा वेग वृद्धिंगत करीत आहे. मालवाहतुकीसाठी चालू असलेल्या संयुक्त अरब अमिरात (यूएई) व भारत समुद्री मार्गावर आता सरळ शारजाह कंटेनर टर्मिनल-जेएनपीटी-कांडला-जेएनपीटी असा नवीन मार्ग सुरू करण्यात आला आहे.

या नवीन सेवेविषयी बोलताना जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांनी सांगितले की, जेएनपीटी भारतातील नंबर एकचे बंदर असून, त्याची कार्यक्षमता अधिक नावीन्यपूर्ण व सुधारण्यासाठी, तसेच व्यापारात वाढ करण्यासाठी अविरतपणे प्रयत्न करीत आहे. आम्ही आयात-निर्यात समुदायाला सुलभ ग्राहक सेवा इज ऑफ डुईंग बिजनेस देण्यासाठी कटिबद्ध आहोत, ज्यामुळे समुद्री क्षेत्रातील व्यापारी भागधारकांसाठी जेएनपीटी पसंतीची निवड ठरत आहे. यूएई आपले बंदर विकसित करीत आहे आणि आशिया, आफ्रिका आणि युरोपमधील ते सुयोग्यरीत्या जोडले गेल्यामुळे जागतिक व्यापारासाठी प्रमुख स्थान बनत आहे. त्यामुळे दोन्ही देशातील समुद्री व्यापार संबंध आशियातील मेरीटाईम क्षेत्राचा विकास करण्यास मदत करतील, तसेच जागतिक बाजारपेठेच्या वाढीसाठी नवीन मार्ग सुरू होईल.

सनमरीन शिपिंग सर्व्हिसच्या एम व्ही पोर्ट क्लागं या मालवाहू जहाजाने शारजाह कंटेनर टर्मिनल ते जेएनपीटी असा पहिला प्रवास केला. हे मालवाहू जहाज 17 मार्चला जेएनपीटीला पोहोचले. शारजाह पोर्ट खालिद ते जेएनपीटी व भारताच्या पश्चिम भागातील इतर बंदरांना हे मालवाहतूक जहाज जलद आणि थेट सेवा देणार असून, ही सेवा भारताचे शेवटचे बंदर ते शारजाह तीन दिवसांच्या गतिमान वेळेत पूर्ण करण्यात येणार आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply