Breaking News

सात चेंडूंत सात षटकार!

शेतकर्‍याच्या मुलाने मोडला युवराज सिंगचा विक्रम

मुंबई : प्रतिनिधी

2007 सालच्या ट्वेन्टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारताच्या युवराज सिंगने इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडची चांगलीच धुलाई केली होती. युवीने 12 वर्षांपूर्वी ब्रॉडच्या एका षटकात सहा षटकार खेचण्याचा पराक्रम केला होता. त्याच्या या खेळीची आठवण जागवणारी फटकेबाजी मुंबईच्या खेळाडूने केली आहे. मुंबईच्या 23 वर्षीय मकरंद पाटीलने एक पाऊल पुढे टाकताना सात चेंडूंत सात षटकार खेचले.

शेतकर्‍याचा मुलगा असलेल्या मकरंदने सलग सात चेंडूंवर (एका षटकात सहा) सात षटकार खेचले. विवा सुपरमार्केटमध्ये विक्रेता असलेल्या मकरंदने टाईम्स शिल्ड स्पर्धेच्या ऋ गटात विवा सुपरमार्केट संघासाठी 26 चेंडूंत 84 धावा चोपल्या आणि महिंद्रा लॉजिस्टीक्स संघाचा पराभव केला. विशेष म्हणजे आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने ही विक्रमी खेळी केली.

मकरंदने सांगितले की, मी चौथा षटकार खेचला तेव्हा एका षटकात सहा चेंडू सीमारेषेपार पाठवेन असे वाटले नव्हते, पण मी जेव्हा सहावा षटकार खेचला तेव्हा सहकारी आनंदाने ओरडू लागले. तेव्हा आपण क्रीझवर नसून चंद्रावर असल्याचे मला भासत होते. सातव्या चेंडूवर खेचलेला षटकार माझ्यासाठी विशेष होता.

युवी आणि रवी शास्त्री यांच्यानंतर सहा चेंडूंत सहा षटकार खेचणार्‍या खेळाडूंमध्ये मकरंदने स्थान पटकावले. शास्त्रींनी एका स्थानिक सामन्यात अशी कामगिरी केली होती. मकरंदच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवरच आहे. तो आजही शेतीत आपल्या वडिलांना मदत करतो.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply