Breaking News

पनवेल तालुक्यात 173 नवीन रुग्ण

   तिघांचा मृत्यू; 208 जणांची कोरोनावर मात

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल तालुक्यात रविवारी (दि. 23) कोरोनाचे 173 नवीन रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू  झाला आहे तर 208 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 119 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर 167 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 54 नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली असून 41 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. तर एकाचा मृत्यू झाला आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात कामोठे येथील सेक्टर 15 व सेक्टर 14 येथील दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत 17, कामोठेमध्ये 20, खारघरमध्ये 34, नवीन पनवेलमध्ये 15, खांदा कॉलनी सहा, पनवेलमध्ये 22, तळोजामध्ये पाच नवीन रुग्ण आहे. महापालिका क्षेत्रात एकूण 10 हजार 434 रुग्ण झाले असून 8843 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84.75 टक्के आहे. 1337 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 254 जणांचा मृत्यू झाला आहे.

पनवेल ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये उलवे 14, आदई सहा,  न्हावा सहा, ओवळे चार, सुकापूर, कोप्रोली, उसर्ली प्रत्येकी तीन, डेरवली, पळस्पे, आकुर्ली प्रत्येकी दोन, देवद, भगतवाडी-सुकापूर, दापोली, गव्हाण, गिरवले, नेरे, पाटणोली, जावळे-वहाळ येथे प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. पनवेल ग्रामीणमध्ये पॉझिटिव्हची संख्या 3115 झाली असून 2626 जणांनी कोरोनावर मात केली असून 60 जणांचा मृत्यू झाला आहे.

उरण तालुक्यात 11 जणांना लागण

उरण : प्रतिनिधी, वार्ताहर

उरण तालुक्यात रविवारी कोरोनाचे नवे 11 रुग्ण आढळून आले असून 21 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आढळलेल्या रुग्णांमध्ये सीआयएसएफ सेक्टर 3 जेएनपीटी दोन, वारीक आळी नागाव दोन, वेश्वि, चिर्ले, उरण, डोंगरी, जेएनपीटी टाऊनशिप, जसखार, व नवघर येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. तर बरे झालेल्या रुग्णांमध्ये ओंकार कॉलिनी कुंभारवाडा चार, जेएनपीटी दोन, आवरे दोन, भेंडखळ दोन, बोरी पाटील आळी, बोरखार, उरण कोळीवाडा, द्रोणागिरी, बोकडविरा, नवघर, मोठीजुई, गोवठणे, वेश्वि, चिर्ले व म्हातवली येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. उरण तालुक्यातून आत्तापर्यंत दोन हजार 360 नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये 1252 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निष्पन्न झाले. तर त्यातील 1020 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, 57 रुग्णांचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय 175 कोरोनाग्रस्त रुग्ण बोकडविरा, जेएनपीटी येथील कोविड सेंटर येथे उपचार घेत आहेत.

कर्जतमध्ये दोन दिवसांत 14 रुग्णांची नोंद

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार

ऐन गणेशोत्सवाच्या पहिल्या दोन दिवसात कर्जत तालुक्यात 14 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. यापैकी शनिवारी नवीन 10 रुग्ण सापडले त्यामध्ये एका कामगार नेत्याचा व एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा समावेश आहे. तर रविवारी चार रुग्ण आढळले आहेत. शनिवारी दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने तालुक्यात मृतांची संख्या 38 वर पोहचली आहे. आजपर्यंत 752 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून 627 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शनिवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये नेरळ पोलीस ठाणे, नेरळ, दहिवली पाटील आळी, कडाव, हलीवली, भिवपुरी रोड – कोषाणे, गुरूनगर मधील गजानन हाईट्स इमारत, तळवली, बोपेले, नेरळ नजीकच्या धमोते गाव परिसर येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. तर रविवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये पोसरी, वारे, नेरळ नजीकच्या हजारेनगर, शेलू येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

रोहा तालुक्यात 14 जणांना संसर्ग

रोहे : प्रतिनिधी

रोहा तालुक्यात कोरोनाचा कहर चालू असून दिवसेंदिवस कोरोना रुग्ण आढळत आहे. त्यामुळे रोहा शहरासह ग्रामीण भागाची चिंता वाढवणारी आहे. रोहा तालुक्यात शहरासह ग्रामीण भागामध्ये रविवारी 14 कोरोना बाधित व्यक्ती आढळले असल्याची माहिती तहसीलदार कविता जाधव यांनी दिली आहे. त्यामुळे रोहा तालुक्याची कोरोना संख्या 1084 वर पोहचली आहे.

रोहा तालुक्यात कोरोनाचा संसर्ग चालूच असून दररोज कोरोना रुग्ण सापडले आहेत. गणेश उत्सव चालू झाल्यामुळे कोरोनाचा फैलाव रोखण्याची गरज आहे. रोहा तालुक्यात रविवारी 14 कोरोना बाधित व्यक्ती सापडले आहेत. त्यामुळे रोहा तालुक्याची कोरोनाची संख्या 1084 एवढी झाली आहे. रोहा तालुक्यात रोहा शहरासह ग्रामीण भागात रविवारी नऊ व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. रोहा शहरासह तालुक्यात कोरोनावर मात करण्याची संख्या 843 एवढी झाली आहे. कोरोनामुळे आत्तापर्यंत 29 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. रोहा तालुक्यात आता 212 सक्रिय कोरोना रुग्ण असून त्यांच्यावर विविध ठिकाणी रुग्णालयात उपचार चालू आहे. रविवारी सापडलेल्या कोरोनामध्ये 10 पुरुष व चार महिलांचा समावेश आहे. यामध्ये 60 वर्षावरील दोन व्यक्ती आढळल्या आहेत.

महाडमध्ये कोरोनाचे 26 नवे रुग्ण

महाड : प्रतिनिधी        

महाड तालुक्यात रविवारी कोरोनाचे 26 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 13 जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर दोघांचा मृत्यू झाला आहे.

आढळलेल्या रुग्णांमध्ये विन्हेरे तीन, अपेक्षा झेरॉक्स रमेश स्टोर शेजारी तीन, महाड दोन, जैनटेंपल जुनी पेठ, हराबी कॉ.देशमुख मोहल्ला, गवळआळी, बिरवाडी, भिवघर, विनती कॉलनी, सावित्री एन्क्लेव्ह, नक्षत्र बिल्डींग बिरवाडी, रिध्दीसिध्दी अपा.नवेनगर, आसनपोई बौद्ध वाडी, अप्पर तुडील, जिवनजोती क्लिनीक बिरवाडी, खैरे, भावे, वरंध कुंभारकोंड, सिटीगार्डन, काळीज, कोटेश्वरीतळे येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. तर विनती कॉलनी 82 वर्षीय  पुरुष व काकरतळे शिंदे आळी येथील 47 वर्षीय पुरुष यांचा मृत्यू झाला आहे. महाडमध्ये 166 कोरोना रुग्ण उपचार घेत असून, 656 जनांनी कोरोनावर मात केली आहे तर 40 जणांचा मृत्यू झाला आहे. तालुक्यात कोरोनाच्या 862 रुग्णांची नोंद झाली आहे.

नवी मुंबईत 375 जण कोरोनामुक्त

नवी मुंबई : नवी मुंबईत रविवारी 375 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले तर 316 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे  नवी मुंबईतील  कोरोना बधितांची एकूण संख्या 23 हजार 321 तर बरे झालेल्यांची 19 हजार 330 झाली आहे. नवी मुंबईचा रिकव्हरी रेट एक टक्क्याने वाढून 83 टक्क्यांवर  पोहचला आहे. रविवारी पाच जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 542 झाली आहे.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply