Breaking News

गावठी हातभट्टी दारूची वाहतूक करणार्याला अटक

रेवदंडा पोलिसांची कारवाई

रेवदंडा : प्रतिनिधी

रेवदंडा पोलिसांनी हद्दीतील मुरूड तालुक्यातील सुपेगाव फाटयावर गावठी हातभट्टीची दारूची वाहतुक मोटर सायकलने करणारा एकास रंगेहाथ पकडून गुन्हा दाखल केला.

याबाबत सविस्तर वृत असे की, रेवदंडा पोलिसांना सुपेगाव फाटयावरून गावठी हातभट्टीची दारू मोटर सायकलने होत असल्याच्या मिळालेला माहितीनुसार ऐन गणेशोत्सोवाचे दिवशी शनिवारी (दि. 22) रात्री 8 वाजण्याचे सुमारास फिल्डींग लावली, त्यानुसार रात्री पावणे 9 च्या सुमारास शिरगाव येथील 32 वर्षीय रितेश सातामकर हा मोटरसायकलवर दोन भरलेल्या प्लास्टिक फुगा घेऊन जात असताना पोलिसांनी हटकले, त्यांची तपासणी केली असता, तो प्लास्टिक फुगा गावठी हातभट्टीच्या दारूने भरलेला असल्याचे आढळून आले. त्यामधील गावठी हातभट्टीची दारूची किमंत अंदाजे दोन हजार रूपये असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.

पोलिसांनी त्यांचेकडील दोन हजार रूपये किमंतीची गावठी हातभट्टीची दारू व वाहतुकीस वापरत असलेली 10 हजार रूपये किंमतीची मोटरसायकल ताब्यात घेतली. व रेवदंडा पोलीस ठाणे येथे विनापरवाना बेकायदा प्रोव्हीबिशनचा माल ताब्यात ठेवून त्यांची वाहतुक केल्याबद्दल रितेश सातमकर यांचे विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. याबाबत अधिक तपास रेवदंडा पोलिस इन्चार्ज पोलीस निरीक्षक सुनिल जैतापुरकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक नलावडे करत आहेत. तर याबद्दलची  फिर्याद पोलीस कर्मचारी राकेश मेहत्तर यांनी नोंदविली आहे.

Check Also

डिस्टन्स इलेव्हनने पटकावले नमो चषक व्हॉलीबॉल विजेतेपद

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता युवा मोर्चा पनवेलच्या वतीने भव्य क्रीडा महोत्सव अर्थात नमो चषक …

Leave a Reply