Breaking News

खारघरमध्ये मतदार ओळखपत्राचे वितरण

नगरसेवक अ‍ॅड. नरेश ठाकूर यांच्या मागणीला यश

खारघर : रामप्रहर वृत्त

खारघरमधील नवीन मतदारांचे तयार झालेले स्मार्ट कार्ड तहसीलदार कार्यालयात उपलब्ध आहेत हे समजताच नगरसेवक  अ‍ॅड. नरेश ठाकूर यांनी मतदार ओळखपत्राचे वितरण करण्यासाठी खारघरमध्ये कॅम्प लावण्याची मागणी पनवेल तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली होती. या निवेदनाची दखल घेत गुरुवारी (दि. 30) खारघरमध्ये मतदार ओळखपत्राचे वितरण करण्यास सुरवात झाली.

मतदारांना प्रत्येक वेळी पनवेल तहसील कार्यालयात येणे शक्य होणार नाही, खारघर भागातील प्रत्येक वॉर्डनुसार स्मार्ट कार्ड वाटपचे कॅम्प लावल्यास त्या भागातील नागरिकांना स्मार्ट कार्ड मिळणे सोयीचे होईल, असे नरेश ठाकूर यांनी दिलेल्या निवेदनात नमुद केले होते. निवेदन देताना नगरसेवक नरेश ठाकूर, अभिमन्यू पाटील, निलेश बाविस्कर, सरचिटणीस किर्ती नवघरे, समीर कदम, वासुदेव पाटील उपस्थित होते. निवेदनाची दखल घेत पनवेल महसूल विभागामार्फत खारघरमध्ये मतदार ओळखपत्र वाटप सुरू झाले आहे.

खारघरमध्ये मतदार ओळखपत्राचे वितरण करण्याच्या उपक्रमात बेलपाडा गाव प्रभाग क्र.5 मधील विठ्ठल मंदिर व गोखले हायस्कूल सेक्टर 12 येथे तहसील कार्यालयातील अधिकार्‍यांना ओळखपत्रे वितरीत करण्यास नेहमीप्रमाणे भाजप नगरसेवक व पदाधिकार्‍यांनी उपस्थित राहून मदत केली.

या वेळी नगरसेवक नरेश ठाकूर, शत्रुघ्न काकडे, खारघर तळोजा मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, सरचिटणिस किर्ती नवघरे, उपाध्यक्ष दिलीप जाधव, युवा मोर्चा सरचिटणीस अमर उपाध्याय, उत्तर रायगड जिल्हा चिटणीस गिता चौधरी व महिला मोर्चा उपाध्यक्ष प्रतिक्षा कदम आदी उपस्थिती होते.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply