नवी दिल्ली ः वृत्तसंस्था अमेरिकेतील 20 लाखांहून अधिक प्रभावी भारतीय-अमेरिकन मतदारांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचार अभियानाच्या व्यवस्थापकांनी व्हिडीओच्या रूपात आपली पहिली जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषणे आणि ट्रम्प यांच्या अहमदाबाद येथील ऐतिहासिक संबोधनाचे संक्षिप्त भाग अंतर्भूत करण्यात आले आहेत. अमेरिकेत येत्या नोव्हेंबर महिन्यात राष्ट्रपतिपदासाठी निवडणूक होत असून त्यासाठीच्या प्रचार अभियानाने वेग पकडला आहे.
Check Also
जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…
2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …