Breaking News

टीव्ही-चित्रपटांच्या शूटिंगसाठी केंद्राची नवी नियमावली

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

टीव्ही व चित्रपटांच्या शूटिंगसाठी केंद्र सरकारने विस्तृत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करीत याबाबतची माहिती दिली. या मार्गदर्शक सूचनांमुळे शूटिंगमधील कर्मचार्‍यांच्या सुरक्षेसाठी योग्य परिस्थिती निर्माण करण्यास मदत मिळेल, असे जावडेकर यांनी म्हटले आहे. या सूचनांत सर्व ठिकाणी फेस मास्कचा वापर व शारीरिक अंतर राखणे अनिवार्य आहे. या सूचना कलाकारांवर लागू होणार नाहीत. यानुसार सीटिंग, कॅटरिंग, क्रू पोझिशन्स, कॅमेरा लोकेशनमध्ये योग्य अंतर राखावे लागणार आहे. रेकॉर्डिंग स्टुडिओ, एडिटिंग रूमध्येही शारीरिक अंतराचे पालन करावे लागेल. सध्या सेट्सवर दर्शकांना जाण्याची परवानगी देण्यात आली नाही.

पीपीई किट बंधनकारक

सेटवरील सर्वांनी फेस कव्हर व मास्क वापरणे सक्तीचे असणार आहे, तर मेकअप आणि हेअर करणार्‍यांनी पीपीई किट घालणे बंधनकारक आहे. कॉलर माईक्स शक्यतो वापरले जाऊ नयेत किंवा वापरले गेलेच तर ते इतर कुणाशी शेअर होऊ नयेत. चित्रीकरणासाठी लागणार्‍या प्रॉपर्टीसुध्दा कमीत कमी वापरल्या जाव्यात आणि त्या वापरण्यापूर्वी त्याचे निर्जंतुकीकरण करणे सक्तीचे आहे.

ज्येष्ठ कलाकारही सेटवर

आता ज्येष्ठ कलाकारही सेटवर येऊ शकणार आहेत. या कलाकारांचीही योग्य काळजी घेतली जावी. सॅनिटायझेशन, त्यांची बसण्याची व्यवस्था, खानपानाची व्यवस्था येथे सर्वत्र फिजिकल डिस्टन्सिंग पाळले जाणे गरजेचे आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply