Breaking News

पनवेल तालुक्यात कोरोनाचे 20 नवीन रुग्ण, तर 26 जण बरे

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल तालुक्यामध्ये शुक्रवारी (दि. 22) कोरोनाग्रस्त 20 नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामध्ये पनवेल महापालिका हद्दीत 14 तर पनवेल ग्रामीण भागात सहा असे नवे कोरोना रुग्ण आहेत. दिवसभरामध्ये महापालिका हद्दीत 15 व ग्रामीण भागात 11 अशा एकुण 26 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तालुक्यात आतापर्यंत कोरोनाचे 466 रुग्ण आढळले असून 18 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

यामध्ये महापालिका क्षेत्रात शुक्रवारी कामोठे सहा, नवीन पनवेल चार खारघर दोन, कळंबोली आणि रोडपाली प्रत्येकी एक असे 14 नवीन रुग्ण व एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर पनवेल ग्रामीणमध्ये देवद (सुकापूर) दोन जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कसळखंड, चिखले, नेरे आणि विचुंबे येथे प्रत्येकी एक नवीन रुग्ण आढळला आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात कलंबोली येथील ब्लॅक स्मिथ कोर्नर येथील 47 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून तिला टायफाईडचा त्रास होता. कामोठे येथे सहा नवीन रुग्ण सापडले असून त्यापैकी सेक्टर 7 जय गणराज सोसायटीत एकाच घरात दोन रुग्ण सापडले असून त्यांना शेजारच्या महिलेपासून संसर्ग झाला असावा. सेक्टर 20 मधील महिला नेरूळ येथील हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी आहे. सेक्टर 21, 35 आणि 11 मध्ये प्रत्येकी एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. नवीन पनवेल मधील सेक्टर 13 ए टाईपमधील एनएमएमटीमधील चालक असलेल्या व्यक्तीला, सेक्टर 14 अमृतवेल अपार्टमेंटमधील सायन हॉस्पिटलमध्ये नर्सला, 5 ए मधील दीपक फर्टीलायझरमध्ये कामाला असलेल्या व्यक्तीला आणि सायन कोळीवाडा येथून मुलीकडे राहायला आलेया महिलेला कोरोंनाची बाधा झाली आहे.

खारघर सेक्टर 12 मधील मुंबईला रे रोडला हार्ड वेअरचा धंदा करणार्‍या व्यक्तीच्या घरात दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. कळंबोली सेक्टर 1 येथील शेडुंग टोल नाक्यावर ड्यूटी करणार्‍या नवी मुंबई पोलिसाला कोरोनाची लागण झाली आहे.रोडपाळी येथील सेक्टर 20 मधील मेडिकल सप्लायर्स असलेल्या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात नागरिकांच्या 2156 टेस्ट झाल्या असून 332 रुग्ण आढळले त्यापैकी 182 जणांनी कोरोनावर मात केली असून 75 जणांचे रिपोर्ट मिळालेले  नाहीत. 15 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शुक्रवारी पनवेल ग्रामीणमध्ये सहा नवीन रुग्ण सापडले त्यामध्ये  देवद (सुकापूर) येथील दोन व्यक्तींचा समावेश आहे. तपाइकी एक बेस्ट मध्ये कामाला असून एक तुर्भे येथील फार्मासीटिकल कंपनीत होता. विचुंबे येथे आकांक्षा बिल्डिंगमधील एका व्यक्तिला कोरोंनाची बाधा झाली आहे. याशिवाय कसळखंड, चिखले आणि नेरे  येथे प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. ग्रामीण भागात 363 टेस्ट घेण्यात आल्या असून 57 टेस्टचे रिपोर्ट बाकी आहेत. आतापर्यंत 134 रुग्ण सापडले असून त्यापैकी 64 रुग्णानी कोरोनावर मात केली असून  तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 67 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply