Breaking News

‘दीपक नायट्रेट’मधील कामगारांना भरघोस पगारवाढ

आमदार प्रशांत ठाकूर, कामगार नेते जितेंद्र घरत यांच्या उपस्थितीत करार

पनवेल : रामप्रहर वृत्त
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कामगार नेते जितेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या दीपक नायट्रेट एम्प्लॉईज युनियनच्या माध्यमातून तळोजा औद्योगिक क्षेत्रातील दीपक नायट्रेट कंपनीमधील कामगारांना दरमहा तब्बल 12 हजार 900 रुपयांची पगारवाढ आणि सुविधा देण्याचा करार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. 28) येथे झाला.
या करारावेळी दीपक नायट्रेट एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष जितेंद्र घरत, कंपनीचे व्यवस्थापक भरत सकपाळे, साईट हेड अविनाश परांजपे, उत्पादन व्यवस्थापक विकास वाकडे, सहाय्यक व्यवस्थापक सोपान पाटील, मोहन रांजणेकर, हर्षल पाटील, तसेच जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे उपाध्यक्ष पांडुरंग पाटील, कार्यालयीन सचिव समीरा चव्हाण, संघटक रवींद्र कोरडे, दीपक नायट्रेट एम्प्लॉईज युनियनचे सरचिटणीस राजेंद्र तारेकर, उपाध्यक्ष सुरेश म्हात्रे, सेक्रेटरी शिवराम म्हात्रे, प्रकाश एगडे, खजिनदार गणेश पाटील आदी उपस्थित होते.
या कराराचा लाभ ‘दीपक नायट्रेट’मधील 50 कामगारांना होणार आहे. चार वर्षांसाठी झालेल्या करारानुसार कामगारांना दरमहा 12 हजार 900 रुपयांची पगारवाढ तसेच थकबाकीपोटी प्रत्येक कामगारास किमान चार लाख रुपये मिळणार आहेत. त्याचबरोबर मेडिक्लेम पॉलिसी, 60 हजार रुपये दिवाळी बोनसही मिळेल.
युनियनच्या पूर्वीच्या अध्यक्षांनी कामगारांच्या बाबतीत दुर्लक्ष केल्याने करार 33 महिने रखडला होता. त्यामुळे कामगारांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना युनियनचे सल्लागार व कामगार नेते जितेंद्र घरत यांना अध्यक्ष म्हणून नेतृत्व स्वीकारले. या नेतृत्वाने व्यवस्थापनाशी चर्चा करून अवघ्या सात महिन्यांत एक आदर्शवत करार घडवून आणला. कामगारहिताचा हा करार लॉकडाऊनच्या काळात कामगारांना न्याय व मोठा दिलासा देणारा ठरला आहे. 

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply