तीन जणांचा मृत्यू; 171 रुग्णांची कोरोनावर मात

पनवेल : प्रतिनिधी
पनवेल तालुक्यात शुक्रवारी (दि. 28) कोरोनाचे 317 नवीन रुग्ण आढळले असून, तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर 171 रुग्णांनी कोरोनावर मात केली. महापालिका हद्दीत दिवसभरात 246 रुग्णांची नोंद झाली असून तीन जणांचा मृत्यू झाला, तर 135 रुग्ण बरे झाले आहे. ग्रामीणमध्ये 71 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 36 रुग्ण बरे झाले आहे. तर तिघांचा मृत्यू झाला आहे.
पनवेल महापालिका हद्दीत पनवेल साठेवाडा, खांदा कॉलनी सेक्टर 9, कामोठे सेक्टर 35 येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शुक्रवारी आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत 49 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1959 झाली आहे. कामोठ्यात 44 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 2387 झाली आहे. खारघरमध्ये 54 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णसंख्या 2262 झाली आहे. नवीन पनवेलमध्ये 47 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 2060 झाली आहे. पनवेलमध्ये 41 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1936 झाली. तळोजामध्ये 11 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 605 आहे. महापालिका क्षेत्रात एकूण 11,209 रुग्ण झाले असून 9791 रुग्ण बरे झाले आहेत. 1142 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 276 जणांचा मृत्यू झाला आहे. पनवेल ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये उलवे 13, डेरवली आठ, दापोली व करंजाडे प्रत्येकी पाच, सुकापूर चार, नेरे व कोप्रोली प्रत्येकी तीन, भिंगार, गव्हाण, गिरवले, कोळखे, न्हावा, नितळस, सांगडे येथे प्रत्येकी दोन, आकुर्ली, भोकरपाडा, कोन, पालीदेवद, विचुंबे, बेलवली, भाताण, चिंचपाडा, गुळसुंदे, खारकोपर, मोर्बे, सावळे, शेडुंग, उसर्ली, वलप, वाजे येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. पनवेल ग्रामीणमध्ये आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 3365 झाली असून 2837 जणांनी कोरोनावर मात केली, तर 64 जणांचा मृत्यू झाला आहे.