पनवेल : रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात 475 नव्या कोरोना रुग्णांची आणि 11 रुग्णांच्या मृत्यूची नोंद शुक्रवारी (दि. 28) झाली. दुसरीकडे 346 जण दिवसभरात बरे झाले आहेत.
पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 317, अलिबाग व रोहा प्रत्येकी 28, पोलादपूर 22, पेण 21, खालापूर 20, उरण 13, सुधागड 12, कर्जत सात, महाड चार, माणगाव दोन आणि मुरूड तालुक्यातील एकाचा समावेश आहे; तर मृत रुग्ण पनवेल तालुक्यात तीन, उरण व खालापूर प्रत्येकी दोन आणि पेण, अलिबाग, तळा, रोहा तालुक्यात प्रत्येकी एक असे आहेत.
नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 26,074 व मृतांची संख्या 779 झाली आहे. जिल्ह्यात 22,136 जण कोरोनामुक्त झाल्याने 3,159 विद्यमान रुग्ण आहेत.
Check Also
अफवांच्या पिकाला सत्याच्या विचारांनी छेद द्या; सोशल मीडियावर सक्रिय अन् बोलके राहा!
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे कार्यकर्त्यांना आवाहन पनवेल ः रामप्रहर वृत्तआजच्या आधुनिक आणि डिजिटल युगात …
RamPrahar – The Panvel Daily Paper